जीबीके प्रतिष्ठानतर्फे वनवासी पाड्यात मजुरांना धान्य वाटप

अंबरनाथ येथील राज्यस्तरावर सेवाभावी कार्यरत गुलाबराव करंजुले- पाटील प्रतिष्ठान व भाजपा अंबरनाथ शहराध्यक्ष अभिजित करंजुले-पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १४ दिवसापासून कोरोना संकट काळात पोलीस आणि संबंधित प्रशासनाला सहकार्य कर्तव्य भावनेतून सामाजिक बांधिलकी जपत मास्क वसॅनिटायझरचे वाटप तसेच विविध भागांतील गरीब गरजू,मजूर आदिवासी बांधवांचा शोध घेऊन जीवनावश्यक वस्तू व शिजवलेले अन्न वाटप केले जात आहे. अंबरनाथ पूर्व चिखलोली गाव व चिखलोली पाडा परिसरतील गोरगरीब मजुरांना विश्वजित गुलाबराव करंजुले-पाटील यांच्यासह प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी घरोघरी जाऊन धान्य वाटप व जंतुनाशक औषधाची फवारणी केली. यावेळी भाजपचे दिलीप कणसे, राजेश नाडकर, विश्वास निंबाळकर, संतोष शिंदे आदी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.