निर्जंतुकीरण करणारी पेटी

अंबरनाथ (प्रतिनिधी): कोरोना महामारीला तोंड देण्यासाठी प्रत्येक देशप्रेमी झटत आहेत. काहींना काही प्रयोग करत रहाणाया ६८ वर्षीय प्रा. भगवान चक्रदेव यांनी चक्क निर्जंतूकीकरण करणारी पेटी तयार केली आहे. या पेटीत हात मोजेमास्क इतकेच काय तर चक्क नोटा सुद्धा या पेटी मध्ये निर्जंतूकीकरण करण्यात येते. संचार बंदी मुळे सर्वजण घरात आहेत. मराठी विज्ञान परिषद अंबरनाथ शाखेचे प्रयोगशील अध्यक्ष भगवान चक्रदेव हे सुद्धा घरातच आहेत. वापरलेले मास्क, मोजे हे टाकून देण्यापेक्षा त्याचा पुनर्वापर करता येईल का? चलनात असलेल्या नोटा तशाच हाताळल्या तर कोरोनाचा विषाणू पसरू लागण्याची शक्यता नाकारता लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे एक ना अनेक विचार भगवान चक्रदेव यांच्या मनात घोळू लागले. त्यांनी आठ दिवस घरात उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करून एक पेटी तयार केली. या पेटीत ७५ डिग्री इतकं तापमान राहू शकत. कोणताही विषाणू हा ५६ डिग्री इतक्या विषाणू हा ५६ डिग्री इतक्या तापमानात मरतो असे तापमानात मरतो असे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे. त्यामुळे या पेटीत मास्क, मोजे, चलनी नोटा आदी सहज निर्जंतूकीकरण करू शकतो असा आत्मविश्वास भगवान चक्रदेव यांनी व्यक्त केला आहे. यातील तापमान जास्त झाले किंवा कमी झाले तर आपोआप यातील दिवा सुरू किंवा बंद होतो. या लाकडी पेटीच्या आतल्या बाजूस आरसे लावण्यात आले आहेत. पेटीत दोनशे वॅटचा बल्ब लावला की पंधरा मिनिटात ७५ डिग्री सेंटीग्रेडइतके तापमान होते. जागतिक आरोग्य संघटनांच्या मानांकनानुसार कोणताही विषाणू ५६ डिग्री सेंटीग्रेड तापमानाला मरून जातोत्यामळे या पेटीत ठेवलेल्या वस्तूंचे निजंतुकीकरण होतेपेटीत ७५ डिग्री सेंटीग्रेड इतके तापमान झाले की आपोआप बल्ब बंद होतो. या पेटीत हातमौजे, मास्क, चलनी नोटा ठेवण्यासाठी खास स्टॅन्ड तयार करण्यात आले आहे. पेटीच्या वर तापमान दर्शक अर्थात थर्मामीटरलावण्यात आला आहे. कोणतीही समस्या उद्भवलीकी विज्ञानाच्या आधारे त्यावर उपाय शोधता येतो. सध्या "कोरोनाविषाणपासून बचाव करण्यासाठी उष्णतेचा वापर केलेली एक पेटी तयार केली आहे. त्यासाठी मी घरात उपलब्ध असलेल्या वस्तूच वापरल्या आहेत. अशी पेटी तयार करण्यासाठी साधारणपणे अडीच ते तीन हजार रूपये खर्च येऊ शकतो असेप्रा. भगवान चक्रदेव यांनी सांगितले आहे. प्लायवूडची पेटी केली आहे. तिला कोटेड कागद चिकटवण्यात आला आहे. आतल्या सर्व बाजूंना आरसे लावण्यात आले आहेत. जेणे करून आतील दिवा पेटला कीआतीलहवा किंवा उष्णता बाहेर पडणार नाही आणि बाहेरील हवा आत जाऊ शकणार नाही. अशी पेटी केली आहे. मास्कव मोजे यासारखे लागणारे साहित्य निर्जंतकीकरण केल्याने पन्हा वापरता येऊ शकतील. आणि चलनी नोटा निर्जंतुकीकरण करता येतील. हा प्रयोग मी यशस्वी केला आहे. आणखी कोणाला यात आणखी चांगला बदल करून नवीन प्रयोग करायचा असल्यास अवश्य करावा असे प्रा. भगवान चक्रदेव यांनी आवाहन केले आहे.