मंबई (प्रतिनिधी) : मुंबई आणि लोणावळा येथे महारोगी आणि कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी आहो रात्रा झटणाच्या "जीवनधारा' या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून कोरोना उर्फ कोविड १९ या अवघ्या जगात थैमान घालणाया विषाणूला हद्दपार करण्यासाठी जे युद्ध केंद्र आणि राज्य सरकारने पुकारले आहे, त्यात सहभागी होऊन लोकांना मदतीसाठी अहर्निश सेवेसाठी कार्य चालविले आहे. ज्यांचे पाट निव्वळ हातावर आह आणि रोज काम केल्याशिवाय दोन काय एकावेळेचेही अन्न मिळ शकत नाही अशा दीनदबळ्या गरीब लोकांसाठी अन्नपदाथ वितरीत करण्यात येत आहे. शिवडी, चित्ता कँप, कौला बंदर, रे रोड,कफ परेड, कुलाबा, सीताफळ वाडी, जिजामाता उद्यान, भायखळा, महाराष्ट्र नगर, लल्लुभाई कंपाऊंड, मानखुर्द पूर्व आणि पश्चिम आदी भागात गेल्या काही दिवसांपासून सुमारे १२०० झोपडपट्टीवासी तसेच सव्वाशे कटंब यांना ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. रे रोड ते शिवडी भागात समारे शंभर वर्कशॉप आहेत आणि तेथील रोजदारी कामगाराना रोज अन्नधान्य पुरविण्याची गरज आहे. या ठिकाणी तसेच चार झोपडपट्ट्यांमध्ये जीवनधारा तर्फे अन्नधान्य वाटप करण्यात येत आहे. रत्ना निधी चॅरिटेबल ट्रस्ट, माझगाव जायंट क्लब आणि नितीन खानापूरकर यांच्या सहकाऱ्याने जीवनधारा चे हे काम सुरु असून देणगीदार बांधवांनी सढळ हस्ते सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या संस्थेचे प्रमुख पदाधिकारी जोन डिसिल्वा आणि शोभा वाजपेयो डिसिल्वा याना जीवनधारा तर्फे करण्यात येत असलेल्या उत्कृष्ट सामाजिक सेवेबद्दल श्रीसिद्धिविनायक देवस्थान ट्रस्ट आणि विविध संस्थांनी पुरस्कार देऊन या संस्थेला गौरविण्यात आले आहे.
कोरोना विरोधी युद्धात, “जीवनधारा” ची मदत!